अडावद सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थीच बनले शिक्षक अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिना कार्यक्रम प्रसंगी शिक्षीका बन...
अडावद सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थीच बनले शिक्षक 
अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात शिक्षक दिना कार्यक्रम प्रसंगी शिक्षीका बनलेले विद्यार्थीनीं
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला मुख्याध्यापक ए जे कदम यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य पार पाडले यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांची शिकवण्याची पद्धत आणि शिस्त यांचे शिक्षकांनी कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक अशोक कदम पर्यवेक्षक एम ए बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात मुलांनी व मुलींनी दिवसभरातील अनुभव व वर्गांत शिकवत असतांना आलेले अनुभव कथन केले तसेच अध्यापनाचे कार्य अतिशय महत्वाचे पण तेवढेच कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. उपशिक्षीका सौ नलिनी पाटील जीवन सिसोदे यांनी मनोगत व्यक्त केले
उपशिक्षिका सौ नलिनी पाटील यांनी गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व . शिक्षकाचे महत्व सांगितले या कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती शुभांगी देशमुख सचीन पाटील, नितीन महाजन यांनी केले या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन सचीन पाटील यांनी केले तर आभार नितीन महाजन यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले
No comments