निंभोरा ( दिपनगर) येथे ९ सप्टेंबर पासुन सांगितमय भागवत सप्ताह भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिपनगर निंभोरा ता ...
निंभोरा ( दिपनगर) येथे ९ सप्टेंबर पासुन सांगितमय भागवत सप्ताह
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिपनगर निंभोरा ता भुसावळ येथे वैकुंठ वासी निवृत्ती छन्नु चौधरी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर निंभोरा बुद्रुक ताभुसावळ येथे दिनांक 9 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 25 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या कालावधीमध्ये दैनंदिन श्रीमद् भागवत कथा सकाळी नऊ ते 11 दुपारी 2 ते 5 या वेळेत कथेचे प्रवक्ते ह भ प श्री गजानन महाराज धानोरा वाल्मीक आश्रम चिंचखेडा जामनेर हे लाभले असून दररोज काकड आरती सकाळी 5 ते 6 .30 विष्णुसहस्त्रनाम सकाळी 6. 30 ते 7 .30 हरिपाठ सायंकाळी 5 .30 वाजता व किर्तन दररोज रात्री 9 ते 10 या कालखंडात आणि काल्याचे किर्तन दिनांक 16 सप्टेंबर 25 मंगळवार रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत होईल.
कालखंडात अनुक्रमे ह भ प मनोज महाराज ओझरखेडा / पंकज महाराज शिरसोली / कैलास महाराज कुरंगी /लक्ष्मण शास्त्री महाराज खेडी - भोकरी प्रल्हाद शास्त्री महाराज भागवताचार्य सिन्नर /संदीप महाराज विटनेर जळके /ज्ञानेश्वर महाराज जळगाव आणि काल्याचे किर्तन ह भ प अनिल महाराज भागवताचार्य कोसगाव यांचे 16 सप्टेंबर 25 रोजी काल्याचे किर्तन दिनांक 15 सप्टेंबर 25 सोमवार रोजी सायंकाळी 4ते 6 यावेळी दिंडी सोहळा आयोजित करण्यात . आला आहे दिनांक 16 सप्टेंबर 25 मंगळवार रोजी महाप्रसाद 12 ते 3 या वेळेत होईल या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन श्रीमती जिजाबाई निवृत्ती चौधरी / वैभव उर्फ राणा निवृत्ती चौधरी /कुं . निकिता निवृत्ती चौधरी श्री .गोपीचंद छन्नु चौधरी सौ चारुशीला गोपीचंद चौधरी चिरंजीव नैतिक गोपीचंद चौधरी श्री . रमाकांत प्रल्हाद चौधरी सौज्योती रमाकांत चौधरी व चौधरी परिवार पिंपरी सेकम - निंभोरा यांनी केले आहे .

No comments