adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गजानन लोखंडकार यांची बीड व जालना जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड..

गजानन लोखंडकार यांची बीड व जालना जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड..  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रहार जनशक्ती पक्ष हा ...

गजानन लोखंडकार यांची बीड व जालना जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड.. 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

प्रहार जनशक्ती पक्ष हा अन्यायाविरुद्ध उभा राहणारा, शोषित–पिडित व वंचितांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. या पक्षाच्या संघटनेला बीड आणि जालना जिल्ह्यात अधिक बळकटी देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मा.गजाननभाऊ लोखंडकार यांची प्रहार जनशक्ती पक्ष – बीड व जालना जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल प्रहार पक्ष प्रमुख मा. बच्चूभाऊ कडू व प्रहार पक्षाचे कार्याध्यक्ष मा.बल्लूभाऊ जवंजाळ यांनी अभिनंदन करून पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

गजानन लोखंडकार यांनी शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी झटणे हा त्यांचा स्वभाव आहे.

नियुक्तीनंतर लोखंडकार यांनी भावना व्यक्त केल्या – “ही जबाबदारी माझ्यासाठी अभिमानाची आहे, पण त्याहूनही मोठं कर्तव्य आहे. प्रहार पक्ष प्रमुख मा.बच्चूभाऊ कडू, प्रहार पक्ष कार्याध्यक्ष मा.बल्लूभाऊ जवंजाळ, पक्ष नेतृत्व, ज्येष्ठ नेते आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

शेतकरी–शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी, बेरोजगार तरुणांच्या भविष्यासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी मी आयुष्यभर लढत राहीन प्रहारचा झेंडा आणखी बुलंद करण्यासाठी मी सदैव कार्यकर्त्यांसोबत असेन.”या नियुक्तीमुळे बीड व जालना जिल्ह्यातील प्रहार कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोशाचे वातावरण निर्माण झाले असून, लोखंडकार यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 🚩

No comments