उमर्टी वनपरिक्षेत्रात अवैध वृक्ष तोड झाल्याची खोटी खबर सदर वनपरिक्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली असता तसा प्रकार झाल्याचे आढळून आले नाही,सहा...
उमर्टी वनपरिक्षेत्रात अवैध वृक्ष तोड झाल्याची खोटी खबर
सदर वनपरिक्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केली असता तसा प्रकार झाल्याचे आढळून आले नाही,सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) चोपडा महेंद्र.बी पाटील
विश्राम तेले चौगाव/ मच्छिंद्र कोळी गलंगी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:-३१ ऑगस्ट रोजी चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल पावरा यांनी चोपडा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के.थोरात यांच्या कडे लेखी तक्रार अर्ज करून उमर्टी वन विभागाच्या हद्दीत असलेले गौऱ्यापाडा जवळील कंमार्टमेंट नंबर २५२,२५३,२५४ मध्ये साधारणपणे दीडशे झाडांची अवैध पणे वृक्ष तोड झाल्याची नमूद करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने यावल वन विभागाचे महेंद्र.बी.पाटील सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक)चोपडा,चोपडा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के.थोरात यांनी आपल्या सहकारी सोबत कंमार्टमेंट नंबर २५२,२५३,२५४ मध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.शिवाय ड्रोन कॅमेराच्या साह्याने देखील व्हिडिओ शुटींग केली असता.कुठल्याही ठिकाणी दिडशे वृक्षांची तोड झाल्याचे आढळून आले नाही.शिवाय गौऱ्यापाडा येथील तक्रारदार यांचेकडे रेशन दुकान आहे. गेल्या तीन महिन्यापासून गावकऱ्यांना मालाची वाटपच केली नाही.असा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी यावेळी सांगीतला.
खरे राजकारण वेगळे आहे परंतु ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे खोटे नाटे अर्ज करून गावातील काही नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वन विभागाच्या जंगलात अवैध वृक्ष तोड झाल्याची लेखी तक्रार केली होती.त्या अनुषंगाने यावल वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक)महेंद्र बी पाटील,चोपडा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी के थोरात, लासुर येथील वनपाल सुर्यप्रकाश सुर्यवंशी, उमर्टी येथील वनपाल प्रशांत सोनवणे, नाकेदार किरण पाटील यांच्या सह वनरक्षक यांना सोबत कंपार्टमेंट नंबर २५२,२५३,२५४ मध्ये प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता वेगवेगळ्या ठिकाणी फक्त २७ वृक्ष तेही त्यात १३ हे जूने वृक्ष ज्यांना नव्याने फुटवे फुटले आहेत असे आहेत.परंतु तक्रारदार यांच्या अर्जा नुसार कुठल्याही ठिकाणी १५० वृक्षांची तोड झाल्याची निर्दशनास आले नाही.
शिवाय उमर्टी येथील वनपाल प्रशांत सोनवणे यांनी तक्रारदार यांना भ्रमणध्वनी करून चौकशी साठी संबंधित अधिकारी वर्ग येत आहे तुम्ही सुध्दा या व आम्हाला कोणत्या ठिकाणी अवैध वृक्ष तोड झाली आहे असे दाखवा.असे सांगून देखील त्यांनी असमर्थता दाखवली.
प्रतिक्रिया
प्रकाश बारेला, वन व्यवस्थापन समिती सदस्य, गौऱ्यापाडा
उमर्टी वन विभागाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अवैध वृक्ष तोड झाली नाही. थोडी फार घर कामाला वस्तू लागतात म्हणून जंगलातून आणतो. तक्रारदार यांच्या कडे रेशन दुकान आहे.अनं त्यांनी जवळ जवळ तीन महिन्यापासून गावकऱ्यांना रेशनचा माल दिला नाही म्हणून आम्ही तहसिलदार कडे तक्रार केली म्हणून ते वन विभागाच्या वनपाल यांना सांगून गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करायला लावतो.


No comments