adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयाच्या चार मुलींची आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 खडसे महाविद्यालयाच्या चार मुलींची आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड    मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मु...

 खडसे महाविद्यालयाच्या चार मुलींची आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड 


  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर :- जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा ए. आर. बी. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथे दिनांक 25/ 9/ 2025 गुरुवार रोजी संपन्न झाल्या. त्यात श्रीमती जी .जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगरच्या खेळाडू कु.पाटील काजल (टी .वाय. बी. ए .)हिची 62 कि.ग्रॅम वजन गटात, पाटील वैष्णवी (एस .वाय. बी. ए .)68कि.ग्रॅम वजन गटात ,सोनी भाग्यश्री( टी.वाय  बी  .ए )72 कि.ग्रॅम वजन गटात ,पाटील योगीता (टी .वाय. बी. एस्सी )76 कि.ग्रॅम वजन गटात फ्री स्टाईल  कुस्ती साठी निवड झाली.

     निवड झालेल्या या खेळाडू उद्या दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेज धुळे येथे सिटी इनडोअर  हाॅल,वाडीभकर रोड ,मेन स्टेडियम येथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धांमध्ये  सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत.

 खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. एच. ए. महाजन यांनी सत्कार केला. याप्रसंगी क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल बढे उपस्थित होते.   

  या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ.वंदना चौधरी, क्रीडा समिती सदस्य प्रा. संजय पाटील, प्रा. अभिषेक पाटील, प्रा. डॉ.संतोष थोरात आणि  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्यात.

No comments