मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी आर. ई. पाटील भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : यावल तालुका शे...
मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी आर. ई. पाटील
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मराठा सेवा संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवीन नियुक्त्या घोषित करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यामध्ये शिरसाड येथील वि.का.सोसायटीचे मा.चेअरमन आर.ई. पाटील सर (ह.मु.किनगाव) यांची नुकतीच मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निवडीचे पत्र मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील सर, नाशिक विभागीय अध्यक्ष रामदादा पवार, विभागीय उपाध्यक्ष सुमित पाटील सर, जिल्हा अध्यक्ष डॉ.अनिल दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी यावल तालुका मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील सर यांच्या सह तालुक्यातील सर्व मराठा समाजातील पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.

No comments