जीप मोटर्सचे शोरूम फोडणारे आरोपी पाठलाग करून पकडले..चोरी केलेले लॅपटॉप मोबाईल एमआयडीसी पोलिसांकडून हस्तगत.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक ...
जीप मोटर्सचे शोरूम फोडणारे आरोपी पाठलाग करून पकडले..चोरी केलेले लॅपटॉप मोबाईल एमआयडीसी पोलिसांकडून हस्तगत..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.८):-अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर शेंडी येथील जीप मोटर्स शोरुम फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस गजाआड करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.घटनेतील फिर्यादी अफ्रिदी रशिद सय्यद (धंदा खाजगी नोकरी जिप मोटर्स येथे जनरल मॅनेजर,राहणार - फकीरवाडा,डी.एस.पी.चौक,ता. जि.अहिल्यानगर) हे अभिमन्यु इंद्रजित नय्यर यांचे जिप मोटर्स शोरुम नगर औरंगाबाद रोड शेंडी येथे कामास असून दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी शोरुम बंद करुन घरी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमती शिवाय, स्वतःचे फायद्याकरीता, लबाडीच्या इराद्याने,जीप मोटर्स शोरुमचे टफन काचेच्या दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरी केली आहे.फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयाविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुरनं. ६७७/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३३१(४), ३०५ (अ) फिर्याद दाखल करण्यात आली होती.सदर गुन्ह्याचा तपास करत असताना एम. आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा हतिक दा-या चव्हाण,रा. काळामाथा, गजराजनगर,ता. जि.अहिल्यानगर,सुंदर नितीन काळे,रा.डायमंड स्टाईलमागे काळामाथा,गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर,संजय ऊर्फ चोच दाऱ्या चव्हाण,रा.डायमंड स्टाईलमागे काळामाथा, गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर यांनी केला असून ते सध्या पोखर्डी शिवारात असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तपास पथकातील अंमलदार यांनी जाऊन त्यांना पाठलाग करुन पकडले.त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता,सदर गुन्हा त्यांनी मिळून केला असल्याचे कबुल केले. त्यांचेकडे अधिक तपास केला असता,सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला एच.पी.कंपनीचा लॅपटॉप,सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल,घरफोडी करण्याकरीता वापरण्यात आलेले कटर,स्क्रू डायव्हर,नट बोल्ट खोलण्याचा टी आकाराचा पान्हा असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक, श्री.वैभव कलुबर्मे,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक बी.चौधरी,सफौ.राकेश खेडकर, पोहेकॉ.राजु सुद्रीक,पोहेकॉ. संदीप पवार,पोहेकॉ.सचिन आडबल,पोकॉ.किशोर जाधव, पोकॉ.नवनाथ दहिफळे,पोकॉ. ज्ञानेश्वर आघाव,पोकॉ.दिपक फुंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडू यांनी केली आहे.

No comments