फैजपूरला ईद मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथे ५ सप्टेंबर र...
फैजपूरला ईद मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे ५ सप्टेंबर रोजी ईद मिलादुन्नबी निमित्त, “ज्याने एका व्यक्तीचे प्राण वाचवले, त्याने संपूर्ण मानवतेचे प्राण वाचवले” हा संदेश पुढे नेत, युवा चळवळ शाखा फैजपूरने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि सुमारे १०६ युनिट रक्तदान गोळा झाले. या कार्यक्रमाला जमात-ए-इस्लामीचे अब्दुल रौफ साहेब, अतिथी एपीआय रामेश्वर मोताले साहेब, पीएसआय सय्यद मोईन साहेब, राजेंद्र राजपूत सर, कलीम खान सदस्य, एमपीजे स्थानिक उपाध्यक्ष महाले सर शेख कुर्बान सदस्य अन्वर खाटिक उपस्थित होते. युवा चळवळीचे अध्यक्ष अब्दुल जलील साहेब, सचिव शेख मोईन साहेब, जावेद शेख सर, शेख साजिद, शेख वसीम, शेख एजाज, अफसर, अली, शेख उमर, शेख याकूब, शेख सैम आणि शेख जावेद (राजू पेंटर) यांच्यासह अनेक सदस्यांनी शिबिराच्या यशस्वीतेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

No comments