खिर्डी येथे ईद-ए-मिलाद उत्साहात व शांततेत साजरी. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील खिर्डी येथे ...
खिर्डी येथे ईद-ए-मिलाद उत्साहात व शांततेत साजरी.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील खिर्डी येथे ईद-ए मिलादुन्नबीनिमित्त काढण्यात आलेल्या आकर्षक मिरवणुकीने खिर्डी गाव गजबजून गेले होते. मिरवणुकीनतंर ‘या अल्लाह जगात शांतता नांदू दे, देशात एकात्मता नांदू दे देश महासत्ता होवू दे’ अशी प्रार्थना करत मुस्लिम समाज बांधवांतर्फे अल्लाहला कडे प्रार्थना करण्यात आली. सुन्नी जामा मस्जिद व अहेले सुन्नत वल जमाअत खिर्डी तर्फे सकाळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुस्लिम समाज बांधवांचा सर्वात पवित्र सण ईद-ए-मिलादुन्नबी रविवारी साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी नऊ वाजता खिर्डी जामा मस्जिद येथून मिरवणुकीची सुरुवात झाली. खिर्डी बुद्रुक मध्ये मुस्लिम वाड्यातून होऊन बाबा साहेब आंबेडकर नगर,नवीन प्लॉट तसेच गावातील मुख्य रस्त्याने हजरत कादरी शाह बाबा दरगाह त्यानंतर खिर्डी खुर्द मुस्लिम वाड्यातून गावाच्या मुख्य गाव दरवाज्या पासून,गावातील मुख्य मार्गाने नवीन प्लॉट,टावर,नंतर व परत जामा मस्जिद येथे समारोप करण्यात आला. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात येवून गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी बांधवांकडून घोषणा देण्यात येत होत्या. तसेच ध्वनी प्रक्षेपकावरुन नातपाक व सलातो सलामचे पठण करण्यात येत होते. मिरवणुकीत निंभोरा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली खिर्डी येतील पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली.


No comments