adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

 जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:-...

 जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत थेपडे विद्यालयाच्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कै.सुशीलाबाई गुलाबराव पाटील यांचे स्मृती प्रित्यर्थ अमर संस्था, आयोजित  जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा  दिनांक 15 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी चोपडा येथील बालमोहन माध्यमिक विद्यालयात उत्साहात संपन्न झाली.

       विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.डी. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नववी अ चा विद्यार्थी मयुरेश धनगर याने सहभाग नोंदवला.सदर स्पर्धा दोन गटात संपन्न झाली. द्वितीय गट इयत्ता आठवी ते दहावी साठी जिल्ह्यातून 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.यात  स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 9 वी अ चा विद्यार्थी मयुरेश महेंद्र धनगर याने प्रथम क्रमांक पटकावला. मयुरेशला ट्रॉफी , प्रमाणपत्र आणि 3001/- रु.रोख पारितोषिक चोपडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय कविता सुर्वे मॅडम यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर श्री.केदारजी थेपडे , संस्थेचे सेक्रेटरी सौ.सुषमाताई थेपडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.डी. चौधरी,उपमुख्याध्यापक श्री.जी.डी. बच्छाव पर्यवेक्षक श्री.के.पी.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. विजेत्या स्पर्धकास श्री.एस.सी.बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. श्री.एस.जे.पवार श्री. डी.एम.सोनवणे श्री.आर.डी.साळुंके यांनी सहकार्य केले. समस्त शिक्षक आणि पालक वर्गामधून मयुरेश वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेतील त्याच्या विजयामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

No comments