आदिवासी पारधी समाजाचे फलक उखडून टाकण्याबाबत तक्रार आणि कठोर कारवाईची मागणी शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आदिवासी पारधी समाज...
आदिवासी पारधी समाजाचे फलक उखडून टाकण्याबाबत तक्रार आणि कठोर कारवाईची मागणी
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आदिवासी पारधी समाजाचे फलक उखडून टाकण्याबाबत तक्रार आणि कठोर कारवाईची मागणी करण्याचे निवेदन सादर करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
आम्ही, जय रावण प्रतिष्ठान महा, राज्य संघटनेच्या वतीने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, दिनांक.7 सप्टेंबर 2025 रोजी काही समाजकंटकांनी आमच्या आदिवासी पारधी समाजाने उंटावद गावात लावलेले आदिवासी क्रांतिकारक समशेरसिंह पारधी यांचा फोटो व आमची कुलदैवत देवीचा फोटो असलेले फलक उखडून टाकले आहेत. हे फलक आमच्या समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीचे प्रतीक असून, त्यांचा उद्देश समाजात जागरूकता आणि एकता निर्माण करणे हा होता. या कृत्यामुळे आदिवासी पारधी समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भावना गंभीररित्या दुखावल्या गेल्या आहेत. हे कृत्य केवळ आमच्या समाजाचा अवमान करणारे नसून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 (SC/ST Act) अंतर्गत गुन्हा ठरतो. विशेषतः, या कायद्याच्या कलम 3(1) अंतर्गत अनुसूचित जमातीच्या व्यक्तींचा अपमान करणे किंवा त्यांच्या भावना दुखावणे हा दखलपात्र गुन्हा आहे. आमच्या मागण्या: या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ शोधून काढावे. दोषींवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 अंतर्गत कठोर कारवाई करावी.
अशा घटनांच्या पुनरावृत्तीस प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. आमच्या समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल दोषींवर योग्य कायदेशीर कारवाई करावी. आम्ही आपणास विनंती करतो की, या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने घेऊन त्वरित कारवाई करावी, जेणेकरून आदिवासी पारधी समाजाला न्याय मिळेल आणि अशा प्रकारच्या समाजविघातक कृत्यांना आळा बसेल.

No comments