धोंडखेडा अवैध दारूबंदी – पँथर सेनेचे कडक इशारे, प्रशासनाचे आश्वासनानंतर उपोषण स्थगित बोदवड (प्रतिनिधी) – (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बोद...
धोंडखेडा अवैध दारूबंदी – पँथर सेनेचे कडक इशारे, प्रशासनाचे आश्वासनानंतर उपोषण स्थगित
बोदवड (प्रतिनिधी) –
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथे अवैध दारू विक्री विरोधात ऑल इंडिया पँथर सेना तर्फे उपोषण सुरू करण्यात आले होते. दिनांक 08 सप्टेंबर 2025 रोजी तहसील प्रशासनाने दारूबंदीबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवा उपजिल्हाध्यक्ष संदीपमाऊ सुरडकर, जिल्हा सचिव सागरभाऊ बावस्कर, तालुकाध्यक्ष अबरार शेख, भुसावळ तालुका अध्यक्ष मंगलभाऊ भालेराव यांनी केले. या प्रसंगी रिपब्लिकन सेना कार्यकर्ते ईश्वरभाऊ सुरवाडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल दांडगे, रवि दांडगे, मयुर रामटेक, ब्रिजेश दांडगे तसेच गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासोबतच अशोक तारू साहेब व त्यांची टीम धोंडखेडा गावात जाऊन दारू विक्रेत्यांच्या घरी भेट दिली आणि सांगितले की “यापुढे कोणीही दारू विकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.” या प्रसंगी गावातील सरपंच, पोलीस पाटील, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार साहेब, बोदवड प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन समस्या लक्षात घेत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शुक्ल विभागाचे अधिकारी जळगाव येथून उपस्थित होते आणि त्यांनीही घटना प्रत्यक्ष पाहून प्रशासनाकडून दखल घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, गावातील अवैध दारूबंदीबाबत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र दारूबंदी पूर्णपणे न झाल्यास दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा पँथर सेनेतर्फे देण्यात आला आहे.

No comments