adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ओरिजनल पत्रकार संघा कडून तीव्र निषेध

 त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ओरिजनल पत्रकार संघा कडून तीव्र निषेध  रावेर प्रतिनिधी मुबार...

 त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ओरिजनल पत्रकार संघा कडून तीव्र निषेध 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा ओरिजनल पत्रकार संघ सावदा तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात फैजपूर प्रांताधिकारी याना निवेदन सादर करण्यात आले. ओरिजनल पत्रकार संघाच्या  निवेदनात म्हटले आहे की, संबंधित गुंडांविरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच प्रवेशकर वसुली करणाऱ्या ए. एस. मल्टी सर्विसेस या कंपनीच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करून सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे व महाराष्ट्रात कुठेही ठेका देऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.

पत्रकारांनी नमूद केले की, नोव्हेंबर २०१९ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात ३०० पेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. मात्र, यापैकी केवळ ४३ प्रकरणांमध्येच या कायद्याचा वापर करण्यात आला आहे. शासनाकडून या कायद्याच्या अंमलबजावणीत दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी व प्रलंबित प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी ओरिजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास सखाराम भारंबे, उपाध्यक्ष दिलीप रामभाऊ चांदेलकर, कार्याध्यक्ष युसुफ शहा सुपडू शाह, सचिव शेख फरीद शेख निरोद्दीन, खजिनदार कैलास भाऊलाल लवंगडे, प्रसिद्धी प्रमुख अझर खान अजमल खान, शेख मुक्तार शेख अरमान, दीपक रमेश श्रावगे, प्रशांत धोंडू सरवदे, आदी उपस्थित होते

No comments