adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बिडगाव येथील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केळीची जवळपास ७०० घडं कापून फेकली

 बिडगाव येथील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केळीची जवळपास ७०० घडं कापून फेकली   खलील आर तडवी प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड  चोपडा ता...

 बिडगाव येथील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केळीची जवळपास ७०० घडं कापून फेकली 


 खलील आर तडवी प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे जवळपास ७०० केळीची घडं कापून फेकली त्यामुळे गावामध्ये संताप व्यक्त केले जात आहे बिडगाव येथील शेतकरी कुर्बान नबाब तडवी गट क्रमांक 209/२ ही शेती बिडगाव शिवारात असून त्यांचे चुलत मामा हुसेन मेहबूब तडवी राहणार मोहरद तालुका चोपडा  त्यांनी निम्मबटाईने ५००० केळीची खोडे लागवड केली होती सदर केळीच्या झाडास घड लागलेले होते तरी सदरचे घड हे १५ दिवसानंतर कापणीसाठी तयार होणार होते  त्या आधीच दिनांक २२/९/२०२५  ८:३० वाजेच्या सुमारास अज्ञात इसामाने शेतात अनधिकृत पणे रात्री प्रवेश करून जवळपास ७०० केळीचे घडं कापून घेतली आहे


तरी परिसरातील अनेक शेतकरी संताप्त करीत आहे सुमारे शेतकऱ्याचे ४०;००० रुपये किमतीचे नुकसान झालेले असून शेतकरी कुर्बान तडवी यांनी अडावद पोलीस स्टेशनला धाव  घेऊन अज्ञात इसामाविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आला आहे तरी पुढील तपास अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अन्वर तडवी हेड कॉन्स्टेबल सुनील तायडे करीत आहे

No comments