शिक्षक- विद्यार्थ्याच्या उत्फुर्त सहभागातुन एक्सप्लोरिंग सायकॉलॉजी उपक्रमातुन संशोधक वृत्तीला चालना इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हे...
शिक्षक- विद्यार्थ्याच्या उत्फुर्त सहभागातुन एक्सप्लोरिंग सायकॉलॉजी उपक्रमातुन संशोधक वृत्तीला चालना
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तापी परिसर विदया मंडळ,फैजपूर संचलित,धनाजी नाना महाविदयालयामध्ये मानसशास्त्र विभागांतर्गत दिनांक 13/9/2025वार शनिवार रोजी एक्सप्लोरिंग सायकॉलॉजी अंतर्गत मानसशास्त्रीय चाचण्या प्रायोगिक उपकरणे, पोस्टर सादरीकरण स्पर्धा या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ .आर बी वाघुळदे सर यांनी भुषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा बारी यांनी केले त्यांनी आयोजना मागचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी मानसशास्त्र हा विषय दैनंदिन जीवनात कसा महत्वाचा आहे व मानसशास्त्रीय चाचण्याद्वारे वेगवेगळ्या सामाजिक, भावनिक, वर्तनिक समस्या सोडवण्यास मदत करतात हे स्पष्ट केले तसेच मानसशास्त्रीय प्रयोगातून व्यक्तीच्या प्रेरणा, भावना धारणा व भ्रमाचे मापन कसे करता येते हे सांगितले व पोस्टर सादरीकरणातून आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेकडे सकारात्मकतेने पाहावे हे सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन फित कापून प्राचार्य डॉ.आर . बी.वाघुळदे सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे म्हटले की, मानसशास्त्र हा विषय इतर शाखांपेक्षा जीवन जगण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्यांनी आयटी हे क्षेत्र जितके अधिक पैसा देते . तितक्याच प्रमाणात मानसशास्त्र हे आयुष्यातील मानसिक समाधान कसे देते हे विशद केले.तसेच त्यांनी धनाजी नाना महाविद्यालयात समुपदेशनकेंद्र उभारून त्याचा लाभ परिसरातील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा व्यक्त करून येत्या पुढील काळात महाविद्यालयात समुपदेशन केंद्र उभारण्यात येईल असे आश्वासित केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.कल्पना पाटील मॅडम डॉ.हरीश नेमाडे उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण प्रोफेसर डॉ. आय. पी ठाकूर, हिंदी विभाग व डॉ. सविता वाय. वाघमारे कलवले, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ. गोविंद मारतळे हे उपस्थित होते तसेच डॉ. स्वप्निल शहा या देखील उपस्थित होत्या.
पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशन मध्ये पदवी विभागातून प्रथम पारितोषिक कुमारी दुर्गेश्वरी पंडित या विद्यार्थिनीने पटकावले तर द्वितीय पारितोषिक कुमारी सानिका मेढे व तृतीय पारितोषिक कुमारी चेतना पाटील या विद्यार्थिनीने पटकावले. तसेच पदव्युत्तर विभागातून प्रथम पारितोषिक छाया किशोर शिरसाळे हिला तर द्वितीय पारितोषिक झीनत असलम तडवी व तृतीय पारितोषिक रूपा राजकुमार अग्रवाल तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक हेमंत येवले या विद्यार्थ्यांनी पटकावले.
बक्षीस वितरण महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हरीश नेमाडे सर प्रोफेसर डॉ. आय .पी .ठाकूर सर हिंदी विभाग, डॉ. सविता वाघमारे मॅडम प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ.जयश्री पाटील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. सरला तडवी वनस्पती शास्त्र विभाग, डॉ. एम के जाधव इतिहास विभाग, डॉ.स्वप्नील शहा प्राणीशास्त्र विभाग यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक धीरज खैरे सर, आभार प्रदर्शन रूपा अग्रवाल यांनी केले व द्वितीय बक्षीस वितरण सत्राचे सूत्रसंचालन झीनत असलम तडवी व आभार प्रदर्शन चेतना पाटील यांनी केले. त्यात कुमार दिपक कोळी, करण तायडे, अजय सुरवाडे, तेजस कोळी यांनी अनमोल असे सहकार्य केले तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित राहून कुतूहलाने पोस्टर प्रेसेंटेशन व मानसशास्त्रीय चाचणी याबद्दल जाणून घेतले.

No comments