अक्कलकोट हळहळले, शाळेतून येताना नातवाचा अपघात, नातवाचा मृतदेह पाहून आजीने सोडला प्राण, ( व्हनमाने ) कुटुंबावर शोककळा..!! सौ. वंदना गिरी ग...
अक्कलकोट हळहळले, शाळेतून येताना नातवाचा अपघात, नातवाचा मृतदेह पाहून आजीने सोडला प्राण, ( व्हनमाने ) कुटुंबावर शोककळा..!!
सौ. वंदना गिरी गोसावी ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अक्कलकोट तालुक्यांतील हन्नुर गावांतून दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये नववी शिकणाऱ्या नातवाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारांवेळी यावेळी आजीनेही प्राण सोडला आहे. आकस्मित निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आजी म्हणजे नातवंडाची दुसरी मैत्रीणच असते. मात्र याच नातवाबद्दल मन पिळवटून टाकणारी घटना अक्कलकोट तालुक्यांतील हन्नुर गावात एकाच दिवशी नातवाला निरोप देताना त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार यावेळी आजीनेही प्राण सोडला आहे. एकच दिवशी एका घरात दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हन्नुर गावातील भीमाशंकर मलाप्पा व्हीनमाने हे वाहन चालक म्हणून काम करतात त्यांच्या कुटुंबात पत्नी मुलगा मुलगी आणि वयोवृद्ध आई असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातला आदित्य व्हनमाने हा चपळगांव येथील ग्रामीण विद्या विकास महाविद्यालयात इयत्ता नववी शिकत होता. बुधवारी शाळा सुटल्यानंतर आदित्य घरी जाण्यासाठी एका दुचाकीस्वराला गावाकडे सोडण्याची विनंती केली होती. दुचाकीवर बसून तो निघाला होता पण अचानक त्या गाडीतील पेट्रोल संपले त्यानंतर दोघे पेट्रोल भरून पुन्हा निघाले असता समोरून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी स्वर गंभीर जखमी झाला आहे. तर आजी जनाबाई व्हनमाने यांना आपल्या लाडक्या आदित्य या नातवावर होत असलेल्या अंत्यसंस्कार प्रसंग पाहून आजीलाही तीव्र धक्का बसला. हा धक्का आजीला सहन न झाल्याने आजीनेही स्मशानभूमीत आपला प्राण सोडला आहे.

No comments