adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासकीय विभागीय कार्यालयात भरदिवसा ढवळ्या आकडा टाकून विज चोरी?

शासकीय विभागीय कार्यालयात भरदिवसा ढवळ्या आकडा टाकून विज चोरी? सर्वांना समान मापदंड न दाखवता महावितरण या वीज चोरीसाठी या कार्यालयांवर मेहरबान...

शासकीय विभागीय कार्यालयात भरदिवसा ढवळ्या आकडा टाकून विज चोरी?

सर्वांना समान मापदंड न दाखवता महावितरण या वीज चोरीसाठी या कार्यालयांवर मेहरबान का झाले? 



अंबाजोगाई प्रतिनिधी :- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शहरातील शासकीय कार्यालयातच वीज चोरीचा राजरोसपणे सपाटा सुरुच

अंबाजोगाई शहरातील एका विभागीय कार्यालयात दिवसा ढवळ्या वीज वाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या शासकीय कार्यालयाचा सावळा प्रताप उजेडात आला असुन या विज चोरीवर महावितरण कोणती कारवाई करणार? याकडे संपुर्ण सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

सर्व सामान्य जनतेने वीज वाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे प्रकार असतांना अशी वीज चोरी पकडल्यानंतर शहरातील गोरगरीबांना मोठा आर्थिक दंड आणि कारवाई झाल्याचे वास्तव्य आहे. परंतु अंबाजोगाई शहरातील मध्यभागी असलेल्या या विभागातील कार्यालयात गेल्या कित्येक वर्षांपासून आकडा टाकूनच वीज वापरली जात आहे. याविरुद्ध आश्चर्य व्यक्त केले आहे. शासकीय कार्यालयात वीजेशिवाय कुठलेच काम चालत नाही, त्यामुळेच आधुनिक साधनासाठी महिन्याला शेकडो युनिटचा होणारा वापर हा कोणाच्या नावावर जातो असा प्रश्न उपस्थित होत असुन या गोंधळाबाबत महावितरण गप्प असल्याने सर्व सामान्य नागरिक संभ्रमात आहेत. सर्वाना समान मापदंड न दाखवता महावितरण या वीज चोरीसाठी या विभागीय कार्यालयांवर मेहरबान का झाली?

गेल्या कित्येक वर्षांपासूनच राजरोसपणे वीजपुरवठा चोरी केल्याचे बील वसुल होणार का? या शासकीय वीज चोरीवर महावितरण कार्यवाहीचे धाडस दाखवणार का? या बाबत वरिष्ठ अधिकारी दखल घेतील का? सर्व सामान्य नागरिकांकडून वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी केल्यास महावितरण कठोर बडगा उघडतो, मग शासकीय कार्यालयांनी हा प्रकार केल्यावर त्यांना अभय का मिळतो. अशी चर्चा सुरू आहे 

No comments