adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी मुलींच्या तक्रारीवर डॉ. चंद्रकांत बारेला यांची तत्पर दखल

 आदिवासी मुलींच्या तक्रारीवर डॉ. चंद्रकांत बारेला यांची तत्पर दखल  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्...

 आदिवासी मुलींच्या तक्रारीवर डॉ. चंद्रकांत बारेला यांची तत्पर दखल 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदिवासी सेल चे राज्य कार्याध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांच्याकडे चोपडा येथील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी वसतिगृहामध्ये आवश्यक सुविधांचा अभाव असल्याची तक्रार केली होती.

याबाबत गंभीरतेने दखल घेत डॉ. बारेला यांनी तत्काळ वसतिगृहाला भेट देऊन मुलींच्या अडचणी जाणून घेतल्या. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, राहण्याची सोय अशा अनेक मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती मुलींनी त्यांना दिली.

तसेच वसतिगृहातील जेवण निकृष्ट दर्जाचे आहे अशी तक्रार मुलींनी केली. यावर सत्यता तपासण्यासाठी डॉ. बारेला यांनी स्वतः भोजन करून पाहिले व विद्यार्थिनींच्या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आले.

या संपूर्ण प्रकरणाची नोंद घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी आदिवासी प्रकल्प सौ सुलताने व सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांना प्रत्यक्ष माहिती दिली.तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासोबत भ्रणध्वनीद्वारे संपर्क साधला व मुलींना कोणतीही अडचण राहू नये, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी डॉ.बारेला म्हणाले की, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी शासन व समाजाने एकत्र येऊन सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. त्यात कुठेही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही."आश्वासन त्यांनी दिले.

 या प्रसंगी डॉ. बारेला म्हणाले की, "आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी शासन व समाजाने एकत्र येऊन सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. त्यात कुठेही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही."

No comments