adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चंद्रकांत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

 चंद्रकांत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शासनमान्य आदिवासी विकास विभाग अनुदानित कर्मचारी सं...

 चंद्रकांत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शासनमान्य आदिवासी विकास विभाग अनुदानित कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत दगडू पाटील यांची सर्वानुमते जळगाव जिल्हाध्यक्ष अर्थात प्रकल्प अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड,राज्याध्यक्ष राजेश पाटील,माजी जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे यांनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सनपूले तालुका चोपडा येथील मुख्याध्यापक तसेच संघटनेतील राज्य कार्यकारणी सदस्य असलेले चंद्रकांत पाटील यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे.येत्या काळात त्यांनी कर्मचारी हितासाठी आग्रही असावे, कर्मचारी व प्रशासन यातील दुवा होऊन कर्मचारी हिताला प्राधान्य देत यापुढील काळाची प्रकल्प अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.विद्यानंद बहुउद्देशीय ग्रामीण सेवा मंडळ सनपुले या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील तसेच सचिव गणेश पाटील व सर्व कर्मचारी यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

No comments