adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुडांना कठोर शासन करावे; पत्रकार फेडरेशनची मागणी

 पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुडांना कठोर शासन करावे; पत्रकार फेडरेशनची मागणी   नाशिक / विशेष प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  सध्...

 पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुडांना कठोर शासन करावे; पत्रकार फेडरेशनची मागणी 

 नाशिक / विशेष प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पत्रकार बांधवांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत, असाच एक प्रकार जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे घडला असून या हल्लाचा अखिल भारतीय पत्रकार फेडरेशनकडून जाहिर निषेध करण्यात आला आहे. 

वृत्त संकलनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्रा जवळ असलेल्या पार्किंग याठिकाणी असलेले गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून नाशिक मधील इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी 

असलेले पत्रकार योगेश खरे अभिजीत सोनवणे, किरण ताजने या पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली. 

पत्रकारांवर झालेल्या सदरील भ्याड हल्ल्याचा अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन यांच्यातर्फे जाहीर निषेध करण्यात येत असून पोलीस प्रशासनाने गुंड प्रवृत्तीच्या अशा या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यातील कलमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना जरबंद करण्यात येवून कठोर शासन करावे अशी मागणी पत्रकार फेडरेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments