पाल ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचे आयोजन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्...
पाल ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचे आयोजन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील पाल येथील ग्रामीण रुग्णालयात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वस्थ नारी – सशक्त परिवार या अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. तसेच प्रास्ताविक डॉ. कळसकर यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा राज्य परिषदेच्या सदस्या गोमती बारेला म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील गोरगरीब जनतेसाठी अनेक लोकहितकारी योजना राबवल्या जात आहेत. महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे व कुटुंब सबल व्हावे हा या अभियानामागील उद्देश आहे.
या अभियानात ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्त्रीरोग विषयक मार्गदर्शन, कुटुंब सशक्तीकरणाविषयी माहिती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास रुपाली कळसकर (महिला रोग तज्ञ), सुवर्णा जावळे, डॉ. प्रसन्न जावळे, डॉ. आसिफ शेख (ऑर्थो), डॉ. स्वप्नील कळसकर (पाल वैद्यकीय अधिकारी), उपसरपंच ललिता उत्तम पवार, भाजपा राज्य परिषद सदस्य गोमती बारेला, तसेच रुग्णकल्याण समिती सदस्य प्रदीप जाधव,सुरेश पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांचे आरोग्य हेच सशक्त कुटुंब आणि प्रगत समाजाची पायाभरणी आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिचारिका सुलभा चौहान विश्वासराव सुरभी वांगेकर लिना राणे रवीना बेंडाळे गोकुळ चौधरी यांनी परिश्रम घेतले संदीप कोळी यांनी सूत्रसंचालन केले

No comments