adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चहाच्या टपरीवर आमदार अमोल दादा जावळे; साधेपणाचे सर्वत्र कौतुक

 चहाच्या टपरीवर आमदार अमोल दादा जावळे; साधेपणाचे सर्वत्र कौतुक  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी :  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल-रावेर तालुक्...

 चहाच्या टपरीवर आमदार अमोल दादा जावळे; साधेपणाचे सर्वत्र कौतुक 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी : 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल-रावेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल दादा जावळे यांनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणाने कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत. काही कार्यकामानिमित्त यावल येथे आले असता आमदार जावळे यांनी बोरवल गेट परिसरातील सुनील कोळी यांच्या चहाच्या टपरीवर अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्वतः चहा बनवून कार्यकर्त्यांना दिला. नेहमी लोकांमध्ये मिसळून वावरणारे आमदार जावळे यांनी टपरीवर चहा बनवून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. याप्रसंगी उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले. "आमदार असूनही ते जमिनीवरचे राहून लोकांशी जिव्हाळ्याने वागत असतात" अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या. दिवसभर या अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटिझन्सकडून आमदार जावळे यांच्या साधेपणाचे कौतुक केले जात आहे.

No comments