नवाय राणी रे तारो नेवतो रे लोल!! गरबो भुवानी तारो नेवतो रे लोल!! आमु आदिवासी आखा एक छे रे लोल..!! कर्जाणे गावात पारंपरिक नवाय सण वाजत नाचत ...
नवाय राणी रे तारो नेवतो रे लोल!! गरबो भुवानी तारो नेवतो रे लोल!! आमु आदिवासी आखा एक छे रे लोल..!!
कर्जाणे गावात पारंपरिक नवाय सण वाजत नाचत जल्लोषात साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज आदिवासी सातपुड्याच्या कुशीत वसलेला कर्जाणे या गावात पारंपारिक सण म्हणजे नवाय साजरा करण्यात आला. आदिवासी प्रकृतिक ऋतूनुसार धरती मातेला पेरणी करितो, आणि चार महिन्यानंतर जे पीक धान्य पिकते जसे की चवळी,भात,काकळी, मक्का, हे धान्य घरात शिजवून प्रथम प्रकृतीला देवाला नैवेद्य दाखवून पुजा अर्चा केल्यानंतर ते भोजन करतात, त्यानंतर बबलू बारेला यांचे नियोजनात रात्री दोनशे ते तीनशे लोकांनी मिळून गावात जल्लोषात,पारंपरिक वेशभूषेत, गरबा,नृत्य, गाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सण धुमक्याने साजरा करण्यात आला,तसेच रात्रभर ज्येष्ठ,श्रेष्टी महिला,पुरुषांनी नृत्य गायनाचा आनंद लुटला.तसेच आदिवासींची ओळख ही कोणा जाती धर्म वरून नाही तर ही सण,रूढी,परंपरा, प्रथा,वेशभुषा,रीती रिवाज,इ त्याची ओळख,असते.
उपस्थित, प्रमोद बारेला उपसरपंच, बबलू बारेला, कालूसिंग बारेला राकेश बारेला, हसरत बारेला, राजकुमार बारेला बाळू बारेला, प्रदीप बारेला, संजय बारेला, रामजी बारेला, राम बारेला,अनिल बारेला,इ होते.


No comments