आश्रमशाळांच्या सांघिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न भरत कोळी यावल ता.यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : येथील एकात्मिक आदिवास...
आश्रमशाळांच्या सांघिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल ता.यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय , यावल अंतर्गत चोपडा बीटमधील शासकिय व अनुदानित आश्रमशाळांच्या सांघिक क्रीडा स्पर्धा दिनांक २४ सप्टेंबर व २६ सप्टेंबर रोजी शासकीय आश्रमशाळा, देवझिरी येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाल्या. प्रकल्प अधिकारी अरूण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे, पवन पाटील, संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धाचे नियोजन करण्यात आले होते. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा चोपडा बीट प्रमुख राजेंद्रजी मुसळे यांच्या हस्ते या दोन दिवसीय चोपडा बीटस्तरीय सांघिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेदरम्यान कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिनाक्षी सुलताने यांनी भेट दिली. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, देवझिरी येथे १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षे आतील मुलामुलींच्या खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल या खेळांच्या सांघिक स्पर्धेत चोपडा बीटमधील पाच शासकीय व आठ अनुदानित आश्रमशाळांमधील पहिल्या दिवशी ७२० विद्यार्थी व दुसऱ्या दिवशी ५७० खेळाडू विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत चोपडा बीट प्रमुख राजेंद्रजी मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट समन्वयक म्हणून ज्ञानेश्वर महाजन, देवझिरी व सतीश पाटील, हातेड यांनी यशस्वीपणे कामकाज बघितले.
खो खो स्पर्धेला पंच म्हणून प्रमोद भालेराव, मधुकर भोई, हितेंद पाटील, लक्ष्मण पाटील, राधेश्याम बारेला तर कबड्डी स्पर्धेला पंच म्हणून सतीश पाटील, महेश शिंदे, रोहीदास मावची, महेंद्र चव्हाण आणि हॉलीबॉल स्पर्धेला पंच म्हणून विशाल राठोड, विजय जाधव, अल्लाउद्दीन तडवी, प्रशांत सैंदाणे यांनी प्रभावीपणे कामगिरी बजावली.
स्पर्धा यशस्वीतेसाठी चोपडा बीट प्रमुख , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे, देवझिरी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक धनराज बच्छिरे, बीट समन्वयक ज्ञानेश्वर महाजन, सतीश पाटील, देवझिरी आश्रमशाळेचे क्रीडा शिक्षक प्रेमसिंग पावरा, मोतीराम बारेला, राजू बारेला, तुषार चौधरी, चोपडा बीटमधील विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधिक्षक, क्रीडा शिक्षक, संघ व्यवस्थापक शिक्षक व शिक्षिका, वर्ग चार कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
खेळाडू विद्यार्थी व उपस्थित कर्मचारी यांच्या दोन दिवस भोजनाच्या व्यवस्थेसाठी मज्जिद तडवी, गजानन कटारे, दस्तगीर तडवी, खडका पावरा, भारसिंग पावरा, खुमसिंग रावताळे सुकलाल मोरे, निर्वासित बारेला, राहूल समशेर यांच्यासह विविध कर्मचारी यांनी मेहनत घेतली वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी तसेच सांघिक क्रीडा स्पर्धेत विजयी संघ पुढे होणाऱ्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. प्रत्येक वर्षी आदिवासी विकास विभागाकडून बीटस्तर , जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते .

No comments