adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वनोली श्री साईबाबा मंदिरात सोमवारी महाप्रसाद

  वनोली श्री साईबाबा मंदिरात सोमवारी महाप्रसाद  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रीक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली येथ...

 वनोली श्री साईबाबा मंदिरात सोमवारी महाप्रसाद 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीक्षेत्र साईबाबा मंदिर वनोली येथे दिनांक 29 सप्टेंबर 25 सोमवार रोजी म्हणजेच आश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी श्री साईबाबा मंदिराचा महाप्रसाद संध्याकाळी आठ ते रात्री उशिरा पावे तो आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला भाविकांनी महाप्रसादासाठी उपस्थिती द्यावीअसे आवाहन साईबाबा संस्थान अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश सदस्य हिरालाल व्यंकट चौधरी आणि  ट्रस्टी गावचे सरपंच उपसरपंच सर्व संचालक मंडळ विका सहकारी सोसायटीची चेअरमन संचालक मंडळ व वनोली ग्रामस्थांनी आवाहन केले आहे  


आश्विन शुद्ध सप्तमी ही दिनांक 29 सप्टेंबर 25 सोमवार रोजी घटस्थापनेनुसार आठव्या दिवशी साईबाबा मंदिरातमहाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .यावेळी सुमारे 25 ते 30 हजाराच्या वर भाविक महाप्रसादाला हजेरी लावतात प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात येतो भाविकांनी शिस्तीने प्रसाद घ्यावा व मंदिर ट्रस्ट समिती व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल व्यंकट चौधरी यांनी केले आहे

 दुसऱ्या दिवशी जे 30 सप्टेंबर 25 मंगळवार रोजी साईबाबा मंदिराची यात्रा संपन्न होईल या दिवशी सव्वाशे फूट उंच देवकाठी धुण्यासाठी  नेण्यात येते तिथून काठीचे स्नान करून तिला सजवून वाजत गाजत गावात आणली जाते डफांच्या वाजंत्री ने ग्रामस्थ एका हातात सजवलेली काठी नाचवतात संध्याकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो व रात्रीनेहमीच्या परंपरेनुसार लोकनाट्य तमाशा मंडळ करमणुकीसाठी ठेवण्यात येतो .

श्री साईबाबा महाराज शिर्डी येथे जात असताना वनोली गावी या मंदिराच्या ठिकाणी थांबले त्यावेळी त्यांच्या हस्ते शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती म्हणूनच या मंदिराला साईबाबा महाराजांचे नाव देण्यात आले आहे .अशी आख्यायिका आहे या ठिकाणी भक्तगण मानता मानतात गोडेतेल नारळ मंदिरात अर्पण करीत असतात सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता त्या ठिकाणी मंदिरात महाराजांनी दोन नंदादीप तेलाने लावले होते . ते आजही जळतात त्यावेळी तेल उपलब्ध नव्हते महाराजांनी पाण्यावर दीपक जाळले होते . त्या दिवसापासून अखंड ज्योत या दिव्याची सुरू असून तेल कधीही खुटत नाही . दहा फूट खोल आणि दहा फूट रुंद अशी टाकी या ठिकाणी मंदिरात बांधण्यात आलेली आहे . त्यात भक्तगण नवस म्हणून तेल आणतात होती संग्रहित होत . तेच तेल दिव्यांमध्ये वापरले जाते व महाराजांचा जो प्रसाद केला जातो त्यावेळी लागणारे तेल इथूनच वापरले जाते सुमारे 40 ते 50 हजाराच्या वर भाविक दरवर्षी दर्शनाला येतात तर महाप्रसादासाठी वनोली कोसगाव दुसखेडा म्हैसवाडी पाडळसा बामनोद विरोदा आ मोदा रिधोरी मांगी करंजी वडोदा सावदा कासवा अकलूद फैजपूर सावदा पिंपरूड येथून भाविक महिलास्वयंपाकासाठी मदत करतात व रात्री महाप्रसादाचे वेळी परिसरातील तरुण वर्ग सहकार्य करतात .

महाप्रसादामध्ये साखरेची खीर पोळ्या गंगाफळ ची भाजी  भाविकांना दिले जाते व उळीदाच्या डाळीचे वडे तळलेले स्वयंपाकात केले जातात या ठिकाणी भाविक गण साहित्य रूपाने सुद्धा देणगी आणून देतात व कार्यक्रम हिरीरीने पार पाडतात .

गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालखंडात युती शासनाच्या माध्यमातून या मंदिराचा खऱ्या अर्थाने विकास झाला . त्यात युतीचे माजी खासदार तथा कृषी मित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे खूप योगदान लाभले आहे . तर राज्याचे मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन  केंद्रीय  मंत्री नामदार रक्षाताई खडसे राज्याचेमंत्री नामदार गुलाबराव पाटील  यांनी अनुदानाच्या रूपाने मोठे सहकार्य केलेले आहे . विकास काम आता जे मिळालेत त्यासाठीयावल रावेर विधानसभा आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचे मोलाचे हातभार लागला असून आता नामदार गिरीश भाऊ च्या माध्यमातून 90 लक्ष रुपयाचे काँक्रिटीकरण पेव्हर ब्लॉक तर पंधरा लाख रुपये अमोल भाऊंकडून - दोन कोटी सभा मंडप गटार संरक्षण भिंत आणि इलेक्ट्रिकल साठी असे ना . गिरीश भाऊ महाजन कडून व भक्तनिवास साठी पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील योचे कडून निधी उपलब्ध झाला .

सदर कार्यक्रमात आरोग्य विभागातर्फे या ठिकाणी शिबिर लावण्यात येते पाडळसा वीज मंडळाचे कर्मचारी दोन दिवस त ळ ठोकून असतात रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव होत असतो ऐनवेळी भाविकांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे जनरेटरची व्यवस्था करण्यात येते .तर पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर  प्रसादा नंतर हात धुण्यासाठी व पिण्यासाठी लावले जातात फैजपुर पोलीस स्टेशन चा पूर्ण स्टॉप बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात .

वनोली या गावी जाण्यासाठी पाडळसे कोसगाव वनोली तसेच बा मणोद वनोलीअसा रस्ता सुस्थितीत असून भाविकांनी शिस्तीने व नियमाने रहदारीत अडथळा होणार नाही याची काळजी घेत सहकार्य कराव असे आवाहन श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट समिती तर्फे करण्यात आले आहे . .

No comments