फैजपूर धनाजी नाना महाविद्यालय अर्थशास्त्र विभागात शिक्षक दिन साजरा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धनाजी नाना महाविद्यालय...
फैजपूर धनाजी नाना महाविद्यालय अर्थशास्त्र विभागात शिक्षक दिन साजरा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील अर्थशास्त्र विभागात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघूळदे साहेब होते.त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले व विद्यापीठ स्तरावर वक्तृत्वस्पर्धेत नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च महाविद्यालय करेल असे जाहीर केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिस्तपालन करणं अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.विद्यार्थीनींनी शिक्षकदिनाचे महत्त्व सांगून,अतिशय हृदयगत मनोगते व्यक्त केली .तसेच यावेळी ग्रंथपाल गायकवाड सरांचे "ग्रंथांचे महत्त्व" यावर भाषण झाले.त्यानंतर प्रमुखपाहुणे प्रा.डॉ.राजेंद्र राजपूत यांचे अतिशय अभ्यासपूर्ण भाषण झाले.शेवटी विभागप्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र ठाकरे यांचे मार्गदर्शनपर/प्रबोधनपर भाषण झाले.प्रास्ताविक प्रा.नयना पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.रमेश वाघ यांनी केले. तर आभार श्वेता भालेराव हिने मानले.

No comments