किळसवाणा प्रकार…थुंकी लाऊन पेरू विक्री शहरात प्रकार उघडकीस कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गाय...
किळसवाणा प्रकार…थुंकी लाऊन पेरू विक्री शहरात प्रकार उघडकीस कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.८):-नगर शहरातील केडगाव परिसरात अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला असून एक फळ विक्रेता तोंडातील थुंकी लावून पेरू विकत असल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस २७४,२७५ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मुकुंद नगर परिसरातील तोफिक बागवान हा फळ विक्रेता पेरू त्यासाठी नगर पुणे रोडवरील केडगाव परिसरात असलेल्या हॉटेल रंगोली समोरील एमएसईबी ऑफिस समोर आपला पेरू विक्रीचा व्यवसाय करत होता. पेरू विकताना तो थुंकी लावून पेरू विक्री करत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.कोतवाली पोलीस ठाण्यात पोकॉ.राहुल मासाळकर यांच्या फिर्यादीवरून तौफिक बागवान याच्या विरोधात नागरिकांच्या आरोग्यास हानी होईल असे वर्तन करत असताना आढळून आले गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ. विश्वास गाजरे हे करीत आहेत.

No comments