adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. सुनिल पाटील यांनी सहपरिवार मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

 डॉ. सुनिल पाटील यांनी सहपरिवार मुख्यमंत्र्यांची घेतली भेट   भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  साकळी ता.यावल :  भाजप...

 डॉ. सुनिल पाटील यांनी सहपरिवार मुख्यमंत्र्यांची घेतली भेट 


 भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 साकळी ता.यावल :  भाजपा वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा पुर्व उपाध्यक्ष डॉ.सुनिल पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ओझर(नाशिक) विमानतळ येथे सहपरिवारासह पत्नी सौ.सुनिता पाटील मुलगी कु.भूमी यांच्यासोबत नुकतीच संकष्टी चतुर्थी बुधवारच्या दिवशी भेट घेत " देवेंद्र व अमृता नावातच गणपती " असलेली आकर्षक फ्रेम भेट दिली.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या नावीन्यपूर्ण भेटीने डॉ.सुनिल पाटील यांची सर्वत्र कौतुक होत आहे. 

        नुकताच आपला गणेशोत्सव उत्साहाने राज्यभर संपन्न झाला. श्री गणपती बाप्पाला १४ विद्या व ६४ कला अवगत होत्या. त्यात चित्रकला यांसारख्या कलापण होत्या. याबाबींचा विचार करून डॉ. सुनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांचे नावानुसार 'देवेंद्र व अमृता या नावातच गणपती बाप्पा ' असलेल्या चित्राच्या आकर्षक फ्रेम भेट दिल्या.  गणपती बाप्पा बुद्धीचा देवता असल्याने योगायोगाने या संकष्टी चतुर्थी दिवशी बुधवार ही होता. या सर्वांची साधर्म्य योग साधत डॉ.सुनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहपरिवार भेटून नावीन्यपूर्ण भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कु. भूमीसोबत संवाद साधत दिवीजा च्या नावाची फ्रेम पण लवकर पाठव.अशी स्मितहास्य करीत गौरवोद्दगार काढले.

No comments