adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात हिंदी सप्ताह उद्घाटन संपन्न

 यावल महाविद्यालयात हिंदी सप्ताह उद्घाटन संपन्न  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)       यावल महाविद्यालयात हिंदी सप्...

 यावल महाविद्यालयात हिंदी सप्ताह उद्घाटन संपन्न 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      यावल महाविद्यालयात हिंदी सप्ताह उद्घाटन कार्यक्रम व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे, कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालय, यावल येथे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी सप्ताह उद्घाटन कार्यक्रम व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

    या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एच जी भंगाळे अध्यक्षस्थानी होते सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरचे प्रा. डॉ. विजय सोनजे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. पी.व्ही पावरा यांनी प्रास्ताविकात म्हटले की, 14 सप्टेंबर हा दिवस प्रत्येक वर्षी राष्ट्रभाषा म्हणून साजरा केला जातो, महाविद्यालयात हिंदी सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता डॉ. विजय सोनजे यांनी विद्यार्थ्यांना वर्तमान काल में हिंदी भाषा का महत्व या विषयावर मार्गदर्शन करताना हिंदी भाषेचे महत्व पटवून सांगितले महात्मा गांधी यांच्या मतानुसार भाषेविना राष्ट्र मुके आहेत, हिंदी भाषेद्वारे आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होते . एक राष्ट्र एक भाषा हा नियम 2020 च्या शैक्षणिक धोरणाद्वारे ठरविण्यात आला होता हिंदी भाषेमध्ये ममत्व आहे म्हणून ती भाषा जिवंत आहे आपल्याला व्यक्त होण्यासाठी हिंदी भाषेची आवश्यकता असते असे सांगितले 

     कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आजी भंगाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की हिंदी भाषा ही विस्तृत भाषा आहे त्यात उपन्यास, कहानी नाटक निबंध यावर विविध साहित्य उपलब्ध आहे, हिंदी साहित्यातील प्रेमचंद मुंशी यांच्या साहित्या विषयी माहिती दिली.  

    या दिवशी काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली त्यात 7 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रथम क्रमांक दीपिका राजेंद्र लवंगे एफ वाय बी ए, द्वितीय क्रमांक नेहा संजय सोनवणे टी वाय बी ए तृतीय क्रमांक भैरवी अजय चौधरी एफ वाय बी एस सी असे क्रमांक काढण्यात आले.      

      काव्यवाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. हेमंत पाटील, प्रा. नागेश्वर जगताप यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments