यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल (दि१३) - य...
यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल (दि१३) - येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली "हरित रसायनशास्त्र" या विषयावर रसायनशास्त्र विभागातील प्रा. रूपाली शिरसाठ यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ.एच. जी.भंगाळे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार हे उपस्थित होते.
प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत सातवे पुष्प गुंफताना प्रा.रूपाली शिरसाठ यांनी हरित रसायनशास्त्राच्या तत्वांबद्दल माहिती देत असतांना घातक रसायनाचा वापर कमी करणे, पर्यावरणासाठी सुरक्षित उत्पादन तयार करणे, ऊर्जा वाचवणे, कचरा कमी करणे असे सांगितले.तसेच या तत्वांचा उद्देश रासायनिक उत्पादनांच्या जीवन चक्रा दरम्यान पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कमी करणे हा आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एच.जी. भंगाळे यांनी हरित रासायनशास्त्राची गरज का पडली? याविषयी सविस्तर, सखोल व अनमोल असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक प्रबोधिनीच्या समन्वयिका डॉ.वैशाली कोष्टी यांनी केले तर आभार प्रा.रत्नाकर कोळी यांनी मानले.यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक उपस्थित होते.

No comments