adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयात इंट्रोडक्शन टू ए.आय. आणी रोबोटिक्स या विषयावर सेमिनार संपन्न

 खडसे महाविद्यालयात इंट्रोडक्शन टू ए.आय. आणी रोबोटिक्स  या विषयावर सेमिनार संपन्न  मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गाय...

 खडसे महाविद्यालयात इंट्रोडक्शन टू ए.आय. आणी रोबोटिक्स  या विषयावर सेमिनार संपन्न 


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

        मुक्ताईनगर : येथील श्रीमती जी. जी. खडसे  महाविद्यालायात इंटरनल क्वालिटी इन्शुरन्स सेल (IQAC) व संगणक शास्त्र विभागामार्फत दि. ०३ सप्टेंबर २०२५ ला “Introduction to AI and Robotics “ विषयावर सेमिनार संपन्न झाला. आजच्या युगात al and Robotics चे महत्व वाढल्याने सेमिनार अयोजित  करण्यात आला.

सदर सेमिनार श्री. ओम चौधरी (Technical educator and operational executive, PHN technology Pvt. Limited pune) यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. AI and Robotics चा  वापर करून वेगवेगळया  क्षेत्रामध्ये जसे की फेस रिकॉग्नेशन ई-कॉमर्स हेल्थकेअर गेमिंग आणि ॲनिमेशन मोबाईल असिस्टंट इंडस्ट्रीज अशाFace Recognition, विविध विषयावर ई कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. जागतिकीकरणाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजी शी जुळवून घेऊन देशासाठी सदैव तत्पर राहावे व नवीन नवीन आविष्कार करून आपले कौशल्य दाखवावे अशी आवर्जून सांगितले. 


   या कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. एच. ए. महाजन,उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे व उपप्राचार्य प्रा. डॉ. वंदना चौधरी उपस्थित होते.  कार्यक्रमाची प्रस्तावना संगणक शास्त्र विभाग प्रमुख  प्रा. डॉ. सीमा राणे यांनी केले.  तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रंजना झिंजोरे यांनी तर प्रा.अभिषेक पाटील यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी एकूण  २४३  विद्यार्थी  सेमिनार ला उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम प्रा. विनोद  महाजन, प्रा. प्रियंका खडसे, प्रा.वर्षा तायडे, प्रा. ज्योत्स्ना पाटील , प्रा. रागिनी देशमुख, प्रा. तेजल पाटील, प्रा. वैष्णवी नाफडे, प्रा. चैताली पाटील, श्री राजू जुमळे यांनी सेमिनार यशस्वीतेसाठी  घेतले.

No comments