येलो मोजेक मुळे खराब झालेल्या पिकाचा सर्वे करा तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विम्याचे पैसे जमा करा बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे निव...
येलो मोजेक मुळे खराब झालेल्या पिकाचा सर्वे करा तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विम्याचे पैसे जमा करा
बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे निवेदन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने मलकापूर तहसीलदार साहेब तसेच मलकापूर कृषी अधिकारी साहेब यांना बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांचे नेतृत्वात निवेदने सादर करण्यात आले.यामध्ये मलकापूर तालुक्यामध्ये हुमनी अळी मुळे झालेले सोयाबीन पिकाचे नुकसानाची पीक पाहणी सर्वेक्षण सुरू असून त्याचा वेग वाढवण्यात यावा तसेच यासोबतच येलो मोजेक रोगामुळे सुद्धा सोयाबीन आणि तुरीचे पीक खराब होत असून त्याचे सुद्धा सर्वेक्षण करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून शासनाने शेतकऱ्यांचा पिक विमा खात्यात जमा करण्याकरता सुरुवात केली असून ही प्रक्रिया मात्र अत्यंत संत गतीने चालत आहे अद्याप पर्यंत तालुक्यामध्ये 19000 शेतकरी पात्र असताना फक्त 3300 लोकांच्याच खात्यामध्ये अद्याप पर्यंत पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे येत्या सोमवार पर्यंत सर्व उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे न झाल्यास मंगळवारपासून कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये गोधडी मुक्काम आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येईल अशा पद्धतीचा सज्जड इशारा सुद्धा तालुका कृषी अधिकारी यांना तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी दिला आहे.
निवेदन सादर करतेवेळी संभाजी शिर्के यांचेसह अक्षय रायपूरे तसेच भाडगणी,निमखेड, पिंपळखुटा, यासह तालुक्यातील शेतकरी तसेच किसान काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते...

No comments