adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील व्यास मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये ईद व शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 यावल येथील व्यास मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये ईद व शिक्षक दिन मोठ्या  उत्साहात साजरा   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -...

 यावल येथील व्यास मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये ईद व शिक्षक दिन मोठ्या  उत्साहात साजरा  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील व्यास मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये ईद व शिक्षक दिन मोठ्या  उत्साहात साजरा करण्यात आला. ईद व शिक्षक दिन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना महाजन मॅडम होत्या. तसेच इंग्लिश मिडीयम च्या प्रिन्सिपल दिपाली धांडे मॅडम व सेमीच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम व इंग्लिश मीडियमच्या पर्यवेक्षिका  गौरी भिरूड मॅडम उपस्थित होत्या. तसेच सरस्वती व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आले. 

ईद-ए-मिलाद बद्दल सौ रुचिता पाटील मॅडम यांनी माहिती सांगितली. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीनी सूत्रसंचालन  केले व माहिती गायत्री सरोदे या विद्यार्थ्यांनीनी दिली.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी प्रिन्सिपल मॅडम यांचे चरण पूजन केले. तसेच दिपाली धांडे मॅडम यांनी शिक्षक दिनाबद्दल माहिती सांगितली. सर्व शिक्षकांचे फुलगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार  केले. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा भेटवस्तू देऊन  सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैष्णवी  नाफडे या विद्यार्थिनीने केले . कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments