राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून भारतभर लोक अदालतीचे आयोजन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राष्ट्रीय...
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून भारतभर लोक अदालतीचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून भारतभर लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने यावल विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर.एस.जगताप तसेच सहदिवाणी न्यायाधीश श्री.जी.आर.कोलते यांच्या तर्फे 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये जास्तीत जास्त केसेस निपटारा करण्याचे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दिनांक 13 सप्टेंबर रोजी भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी न्यायप्रणाली मध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जात असतो. या लोकदलातीमध्ये आपापसातील मतभेद,तंटे,न्यायप्रविष्ठ वाद मिटवण्याची संधी असते. लोक अदालत ही न्याय मिळवून देण्याची जलद, फायदेशीर आणि सोपी पद्धती आहे. लोक अदालतीमुळे कायद्याची औपचारिक भाषा वगळून सहज सोप्या भाषेत वादी प्रतिवादी यांना समजेल अशा भाषेत तसेच दोन्ही पक्षांना मान्य होईल असा न्याय निवाडा केला जातो. ज्यामुळे न्यायव्यवस्थेवरील ताण कमी करण्यास मदत मिळते. शिवाय ही बाब खर्चिक नसल्याने आणि पुन्हा अपिलाची तरतूद नसल्याने लोकांना झटपट न्याय मिळण्यास मदत होते. समाजात सोहार्द टिकवण्यासही सहकार्य लाभते.
या लोक अदालतीच्या माध्यमातून नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीची थकीत कर वसुली, नळपट्टी, राष्ट्रीय बँकांची कर्ज प्रकरणी, वीज मंडळाची थकित वीजबिले, भारतीय दूरसंचार विभागाची थकीत फोन बीले इत्यादी विविध न्यायपूर्व प्रकरणी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणांचा झटपट निकाल लावण्यात येतो. न्यायालयीन लांबलचक प्रक्रिया टाळता येऊन लवकरात लवकर निकाल लागण्यास मदत होते म्हणून या लोक अदालतीच्या अनुषंगाने यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश श्री.आर.एस.जगताप यांनी दिनांक 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोक अदालत चा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
No comments