adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावंतवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवले, कोकरूड पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या..!!

 सावंतवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवले, कोकरूड पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या..!!   संभाजी पुरीगोसावी ( सांगली जिल्हा ...

 सावंतवाडीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवले, कोकरूड पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या..!! 


 संभाजी पुरीगोसावी ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 संशयाचं भूत जर मनात बसलं आणि ते आवरलं नाही तर नक्कीच आपल्या हातातून काहीतरी घटना घडत असते. अशीच घटना सांगली जिल्ह्यातील सावंतवाडी ( ता. शिराळा ) कोकरूड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून पेटवल्याची घटना गुरुवारी घडली आहे. यात पत्नी अनिता संजय बेंडगे ( वय 40 ) गंभीर जखमी झाले असून तिला उपचारांसाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी तिची प्रकृती अचानक बिघडली यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मध्ये पती संजय बयाजी बेंगडे (वय 53) याच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पती संजयला दारूचे व्यसन होते त्यामुळे संजय वेळोवेळी आणि त्याच्या चारित्र्यांवर संशय घेत होता तिला वारंवार मारहाण करीत असे. गुरुवारी घरांमध्ये अनिता स्वयंपाक करीत असताना तिच्याशी वाद घालण्यात सुरुवात केली त्यानंतर मारहाण,शिवीगाळ करीत रागांच्या भरातच चूल पेटवण्यासाठी आणलेले डिझेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवले या घटनेत अनिता भेंडगे ही 70 टक्के भाजली होती. तिला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. पहाटेच्या सुमारांस तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पती विरोधांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी  उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील स.पो.नि.राहुल अतिर्गे यांनी भेट दिली अधिक तपास राहुल अतिर्गे करीत आहेत.

No comments