adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मरहूम शाह निजाम (RTO) यांच्या स्मरणार्थ नगरमध्ये ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन

 मरहूम शाह निजाम (RTO) यांच्या स्मरणार्थ नगरमध्ये ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन  श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मरहूम शा...

 मरहूम शाह निजाम (RTO) यांच्या स्मरणार्थ नगरमध्ये ऑल इंडिया मुशायऱ्याचे आयोजन 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मरहूम शाह निजाम नन्हेमिया सय्यद (शाह RTO) यांच्या स्मरणार्थ एन.एम.फाऊंडेशन  मुकुंदनगर, ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर आणि मखदूम सोसायटी यांच्या वतीने एक भव्य ऑल इंडिया मुशायरा येत्या रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता नगर शहरातील मुकुंदनगर येथील एन.एम. गार्डन याठिकाणी पार पडणार असल्याचे आयोजक एन.एम. फाऊंडेशनचे जाहीद सय्यद यांनी सांगितले.

या मुशायऱ्यात देशातील नामांकित शायरांचा सहभाग असणार असून यामध्ये शऊर आशना (बुरहानपूर), डॉ.कमर सुरूर, सुफियान काझी (खंडवा), सय्यद खलील, मुजावर मालेगावी (मालेगाव), बिलाल अहमदनगरी, आसिफ सर, जमील साहिर (मालेगाव), हबीब पेंटर, सुलैमान अहमदनगरी आणि मुन्नवर हुसेन यांची विशेष उपस्थिती असणार असल्याचे मखदुम एज्यूकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी सांगितले.

या अनोख्या मुशायऱ्यात सहभागी होण्यासाठी नगरकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

तरी या मुशार्‍यात सर्व गझल रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगरचे अध्यक्ष खान साहब शेख यांनी केले आहे.


वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments