अमृत टप्पा 2चे हेडवर्क व अशुध्द जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू कोणतेही काम सुरू नसतांना या कामाचे संबंधित ठेकेदाराला करोडो रूपयांचे प्रमाणापे...
अमृत टप्पा 2चे हेडवर्क व अशुध्द जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू
कोणतेही काम सुरू नसतांना या कामाचे संबंधित ठेकेदाराला करोडो रूपयांचे प्रमाणापेक्षा जास्त बिल अदा केल्याची तक्रार सामजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांची तक्रार
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भुसावळ - येथील अमृत टप्पा 2चे हेडवर्क व अशुध्द जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू असून या व्यतिरिक्त कोणतेही काम सुरू नसतांना या कामाचे संबंधित ठेकेदाराला करोडो रूपयांचे प्रमाणापेक्षा जास्त बिल अदा केल्याची तक्रार सामजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे दि. 17-9-2025 रोजी केली होती. या तक्रार अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना पत्र क्र. जा.क्र. पालिका-3/ई-ऑफिस/2025 दि.1-10-2025 रोजी देत याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अर्जदाराने नमुद मुद्यांबाबत नियमोचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीची एक प्रत अर्जदार केदार सानप यांना द्यावे असे सह.आयुक्त नगरविकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालयातील जनार्दन पवार यांनी आदेश म्हटले आहे. याबाबत काय कारवाई होते याकडे भुसावळकरांचे लक्ष लागून आहे.

No comments