सातारच्या जय भवानी विकास नवदुर्गाच्या मंडळात पोलीस अधीक्षकांना आरती मान; पोलीस अधीक्षकांचे गोसावी परिवाराकडूंन स्वागत..!! सौ. प्रियांका...
सातारच्या जय भवानी विकास नवदुर्गाच्या मंडळात पोलीस अधीक्षकांना आरती मान; पोलीस अधीक्षकांचे गोसावी परिवाराकडूंन स्वागत..!!
सौ. प्रियांका देशमुख ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सध्या सर्वत्र गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सव देखील उत्सव ही संपन्न होत आहे. आणि या उत्सवामध्ये प्रशासकीय अधिकारी देखील भक्तिमय वातावरणात विलीन असल्याचे पाहायला मिळत आहे. मंडळाच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील आरतीसाठी आवर्जून निमंत्रित केले जाते. त्या अनुषंगाने सातारा शहरांतील गडकरी आळीतील जय भवानी विकास नवदुर्गांच्या मंडळाच्या वतीने आदरणीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना आरतीचा मान देण्यात आला होता. सातारच्या गडकरी आळीतील नवदुर्गा मंडळास आदरणीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली सदिंच्छा भेट... यावेळी गडकरी आळीतील संपूर्ण गोसावी मित्र परिवाराकडून तसेच जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष जगन्नाथ गिरी ( तात्या ) यांच्या उपस्थितीत समाजाकडूंन पोलीस अधीक्षकांचे शाल, श्रीफळ बुके देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मंडळातील सर्वच जेष्ठ पदाधिकारी तरुणवर्ग महिला यांच्याशी मनमोकळा संवाद साधला, गडकर आळीच्या जय भवानी विकास नवदुर्गा मंडळात चक्क पोलीस अधीक्षक आल्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते सर्वच कार्यकर्ते भारावून गेले होते. यावेळी उपस्थित महिलांनी पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत सेल्फी तसेच फोटो काढले, यावेळी जय भवानी विकास नवदुर्गा मंडळातील तसेच सर्वच गोसावी समाज मित्र परिवाराकडूंन पोलीस अधीक्षकांचे जाहीर आभार मानण्यात आले,

No comments