सोशल मीडियावर गुन्हेगारी वृत्तीच्या रिल्स बनविणे टाळा.. कायद्यात राहालं तर फायद्यात राहाल - पीआय डॉ विशाल जयस्वाल मुबारक तडवी रावेर (सं...
सोशल मीडियावर गुन्हेगारी वृत्तीच्या रिल्स बनविणे टाळा..
कायद्यात राहालं तर फायद्यात राहाल - पीआय डॉ विशाल जयस्वाल
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोशल मीडियावर गुन्हेगारांची स्टाईल बघून प्रभावित होवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्हिडिओ रिल्स बनविणे सोपं आहे..पण हीच रिल्स पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास येवून
जेव्हा पोलीस तुमचा स्मार्टफोन मोबाईल ट्रॅक करून थेट दारात येऊन विचारतात –‘हे पोस्ट तुम्हीच केलंय का?’ तेव्हा चेहऱ्यावरचा रंग उडतो.आमच्या जळगाव पोलीस पॅट्रोलिंग उपक्रमांतर्गत आणखी अशा आरोपींना ताब्यात घेतलेले व्हिडिओ🎥-इतरांसाठी कठोर इशारा
आपण अशा रील्स पोस्ट केल्या असतील तर त्वरित डिलीट करा. जर लाईक किंवा शेअर केल्या असतील तर लगेच अनलाईक व अनशेअर करा. गुन्हेगारांचा ग्लॅमर हा फक्त दिखावा आहे, अशा उपद्रवीवर पोलिसांची नजर असतेच आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्हिडिओ रिल्स बनविणाऱ्यांना पोलीस हिसका दाखवला जातोच तरी सोशल मिडिया नेटवर्किंग साइटवर गुन्हेगारी भाईगिरी प्रवृत्तीच्या व्हिडिओ रिल्स बनविणे टाळा व कायद्याच्या कचाट्यात येणे टाळा कायद्यात राहालं तर फायद्यात राहाल असे आवाहन रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी केले आहे

No comments