नारायणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांची बदली, पोलीस कर्मचाऱ्यांसह नारायणगांवकर भावुक..!! संभाजी ...
नारायणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांची बदली, पोलीस कर्मचाऱ्यांसह नारायणगांवकर भावुक..!!
संभाजी पूर गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या विभागात बुधवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या आदेशावरून काही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नारायणगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आणि नेहमीच प्रयत्नशील राहणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांची बदली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचा दांडगा अनुभव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची नुकतीच नारायणगांव येथून स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. ते यापूर्वी नारायणगांव पोलीस ठाणेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. जिथे त्यांनी विविध सामाजिक आणि पोलीस कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. नारायणगांव पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, नारायणगावांत त्यांनी सामाजिक आव्हाने केली आणि पोलीस कामांमध्ये नेहमीच योगदान दिले, पोलीस ठाणेला त्यांच्या नेतृत्वाखाली आयएएस मानांकही देखील प्राप्त झाला होता. नारायणगांव पोलीस ठाणेत रुजू स्वीकारल्यापासून त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्न केले, दि. 16 जुलै 2023 रोजी त्यांची नारायणगांव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. खाकी वर्दीतील आपलेपणा आणि वर्दीतील माणुसकी जपणारा अधिकारी म्हणून शेलार यांना चांगलेच ओळखले जाते. नारायणगांव पोलीस ठाणेत त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला, तसेच निवडणुका आगामी सण उत्सव देखील शांततेत साजरे करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी नागरिकांना केले होते. नागरिकांच्या काही तक्रार असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा असेही त्यांनी आवाहन केले होते. अशा आव्हानामुळे त्यांची नारायणगांव परिसरांत एक आगळीवेगळी ओळख त्यांनी चांगलीच निर्माण केली होती. त्यांच्या बदलीने पोलीस कर्मचाऱ्यासह पत्रकार बांधव आणि सर्वच मित्रपरिवारांसह नारायणगांवकर देखील भावुक झाले असल्याचे पहायला मिळत आहे. साहेबांनी पुन्हा नारायणगांव पोलीस ठाणेत यावे, अशा प्रतिक्रिया सध्या सर्वत्र दिसून येत आहेत.

No comments