नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांनी बुधवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला संभाजी पुरीगोसावी (नाशिक जिल्हा) प्रतिनिधी. (...
नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांनी बुधवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला
संभाजी पुरीगोसावी (नाशिक जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांनी बुधवारी दुपारी नाशिक जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले, त्यानंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मंत्री अजित दादा पवार आणि गिरीश महाजन यांनी खास आपल्या जवळकीचे व मर्जीतले असल्याने आयुष प्रसाद यांना नाशिकमध्ये आणल्याच्या मधूर चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. आयुष प्रसाद यांचे मत जाणून घेण्यासाठी यावर पत्रकारांनी प्रश्न केला असता. प्रसाद यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आयुष प्रसाद म्हणाले, मी जिथे जातो तेथील नेत्यांशी माझे नाव जोडले जातात पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत असताना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून सांगण्यात आले, आता जळगांव जिल्हाधिकारी म्हणून आल्यानंतरही मंत्री गिरीश महाजन यांच्याशी माझे नाव जोडले गेले आहे. पण मंत्री महाजन हे तुम्ही एकनाथ खडसे यांच्या जवळकीचे असल्याचे बोलले जात आहे. परंतु मी कोणाचाच नाही असे स्पष्ट नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले आहे. प्रसाद हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2015 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी घोडेगांव (जि. पुणे) येथे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अकोला आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जळगांव जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

No comments