मोठा वाघोदा येथे भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांना अभिवादन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) गोपालकृष...
मोठा वाघोदा येथे भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांना अभिवादन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गोपालकृष्ण वाचनालय मोठा वाघोदा बुद्रुक येथे भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती मोठा उत्साह साजरी करण्यात आली आणि शासनाच्या धोरणानुसार डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला सर्वप्रथम डॉक्टर कलाम यांच्या फोटोला वाचनालयाचे सभासद डॉ. गुरुदत्त पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला आणि श्री विजयकुमार पाटील यांनी डॉ कलाम यांच्या चरित्राविषयी आणि कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली आणि वाचकांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले
आणि वाचनालयात पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले आणि मुला-मुलींकडून डॉ कलाम विषयी निबंध लिहून घेण्यात आले आणि वाचनालयाचे अध्यक्ष श्री पी टी महाजन यांच्या हस्ते निबंध स्पर्धेला बक्षीस देण्यात आले आणि पूर्ण दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी वाचनालयाचे संचालक मंडळ आणि वाचक वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित होते
No comments