यावल महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस साजरा.. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मरा...
यावल महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस साजरा..
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.
उपप्राचार्य डॉ हेमंत भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करुन करण्यात आली. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अग्निपंख या त्यांच्या प्रेरणादायी आत्मकथनाचा परिचय व्हावा या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या वतीने क्रमाक्रमाने एक एक पानाचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी इतरही आवडीच्या पुस्तकातील उतारा वाचून उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला.
वाचनाची आवड होती म्हणूनच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संशोधक पासून ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांची कामगिरी डोळे दिपवणारी आहे म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एक चांगला वाचक काय करु शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कलाम साहेब असे सांगून दररोज एक तास तरी वाचन केले पाहिजे असे आवाहन उपप्राचार्य डॉ हेमंत भंगाळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले. प्रास्ताविक प्रा रत्नाकर कोळी यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. हेमंत पाटील यांनी व आभार प्रदर्शन प्रा प्रशांत मोरे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा रामेश्र्वर निंबाळकर प्रा. अक्षय सपकाळे, डॉ. संतोष जाधव यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्रा. निर्मला पवार, प्रा. प्रतिभा रावते प्रा. नागेश्वर जगताप आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
No comments