सातारा तालुका एहसास मतिमंद शाळेत केली दिवाळी साजरी, पोलीस निरीक्षक निलेश तांबे ! प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सध्या सर्वत्र ...
सातारा तालुका एहसास मतिमंद शाळेत केली दिवाळी साजरी, पोलीस निरीक्षक
निलेश तांबे ! प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम चांगलीच सुरू आहे. दिवाळी ही तर आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरी करीत असतो. पण एक आगळ्यावेगळ्या उपक्रमांतून आणि थेट मतिमंद मुलांच्या समवेत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय सातारा तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या परिवारांसह आणि पोलीस ठाणेकडील कर्मचार्यांसमवेत घेतला आहे. 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी पाहुणे एक वाजेपर्यंत मतिमंद मुलांसमवेत आपली दिवाळी साजरी केली आहे. सातारा तालुक्यांतील वळसे येथील एहसास मतिमंद मुलांच्यामध्ये आदरणीय पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या परिवारांसह व सातारा तालुका पोलीस ठाणेकडील कर्मचाऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी पोलीस निरीक्षकांनी शाळेतील मुलांना दिवाळी फराळ तसेच फटाके आणि शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले यावेळी शाळेतील मतिमंद मुलामुलींनी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

No comments