महाराष्ट्र राज्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांचा नोव्हेंबर महिन्यात संपावर जळगाव प्रतिनिधी (स...
महाराष्ट्र राज्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांचा नोव्हेंबर महिन्यात संपावर
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांचा नोव्हेंबर महिन्यामध्ये ३ दिवसीय दि.१२ नोव्हेंबर २०२५ पासून ते १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत संपावर जाणार..... अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे सर्व केंद्र चालकांना आवाहन... संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय (खान्देश विभाग) प्रदेश उपाध्यक्ष श्री.जगदीश युवराज तायडे यांचे खान्देशातील सर्व केंद्र चालकांनी आपले केंद्र बंद करुन ३ दिवसीय संपामध्ये सहभाग होण्यासाठी दिले आदेश याबाबत अधिक माहिती अशी की
राज्यस्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे १ वर्षापासून महाराष्ट्र शासनाला व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदनं दिलेलं असून त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत ठोस पाऊल न उचल्याने व आमच्या विविध मागण्या मान्य न केल्याने अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे नोव्हेंबर महिन्यामध्ये दि.१२/११/२०२५ पासून ते दि.१४/११/२०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र चालकांचा ३ दिवसीय संपावर जाणार आहेत तरी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व महा-ई- सेवा केंद्र व आधार केंद्र हे ३ दिवस बंद राहतील असे आवाहन अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे करण्यांत आलेले आहे तरी महाराष्ट्र राज्यामधील सर्व केंद्र चालकांनी आपापले केंद्र हे ३ दिवस बंद करुन या ३ दिवसीय संपामध्ये सहभाग व्हायचं आहे याची सर्व केंद्र चालकांनी नोंद घ्यावी.*

No comments