बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसची वज्रमूठ निर्धार सभा संपन्न शेतकऱ्यांनी एकजूट होऊन लढण्याचा निर्धार करावा.- पराग पष्टे, प्रदेश अध्यक्ष किसा...
बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसची वज्रमूठ निर्धार सभा संपन्न
शेतकऱ्यांनी एकजूट होऊन लढण्याचा निर्धार करावा.- पराग पष्टे, प्रदेश अध्यक्ष किसान काँग्रेस
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर तालुक्यातील उमाळी या गावी दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शेतकरी वज्रमुठ निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे, शेतकऱ्यांच्या पिकाचे वन्यप्राण्यापासून संरक्षण, इत्यादी विषयावर सविस्तर अशी चर्चा झाली. या सर्व मागण्या शासनाने त्वरित मान्य न केल्यास जन आंदोलन उभे करण्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी या सभेचे आयोजक मा संभाजी शिर्के जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस यांनी प्रास्तविकामध्ये त्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाची, भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका व शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी जन आंदोलन उभे करणार असे त्यांनी जाहीर केले. यावेळी प्रामुख्याने मा परागजी पाष्टे प्रदेशाध्यक्ष किसान काँग्रेस, मा राजेश एकडे माजी आमदार, मा लक्ष्मण दादा घुमरे प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस, मा डॉ अरविंद कोलते सरचिटणीस प्रदेश काँग्रेस, मा रशीदखा जमादार प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग, माननीय सौ स्वातीताई वाकेकर पक्षनेत्या जळगाव जामोद, मा चित्रांगण खंडारे प्रदेश उपाध्यक्ष किसान काँग्रेस, मा मंगलाताई पाटील जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस, इत्यादींनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी दर्शवली. यामध्ये या भागातील हजारो शेतकऱ्यांनी यावेळी आयोजित आंदोलनामध्ये सामील व्हावे अशा असे आवाहन केले. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्याच्या कसे विरोधात आहे ते त्यांनी आपल्या भाषणातून सविस्तरपणे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर मा रामविजय बुरुंगले सरचिटणीस प्रदेश काँग्रेस, मा भगवानराव धांडे मा प्रमोद दादा अवसरमोल मा पदमराव पाटील मा राजू पाटील मा सोपानभाऊ शेलकर मा बंडूभाऊ चौधरी मा डॉ सलीम मा अनिल जयस्वाल मा युसूफ खान मा जाकीर मेनन मा प्रीतीताई भगत मा आशाताई फरतोडे मा सुगंधाताई पवार मा अनिल भारंबे मा राजू जवरे माननीय ऍड दिलीप बगाडे मा गुलाम हुसेन मा विनायकराव देशमुख मा गिरीश देशमुख इ पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास बहुसंख्येने गावातील व इतर गावातील कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.


No comments