संविधान आर्मी तर्फे संविधान आक्रोश जाहीर सभा व संविधान तिरंगा गौरव रॅली रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा :-...
संविधान आर्मी तर्फे संविधान आक्रोश जाहीर सभा व संविधान तिरंगा गौरव रॅली
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा :- ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे संविधान निर्माते भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका हॉलमध्ये आयोजित संविधान आक्रोश जाहीर सभा व संविधान तिरंगा गौरव रॅली कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.यावेळी संख्येने आंबेडकरी विचारधारेला अंगीकृत केलेला जनसमुदाय उपस्थित होता.
सदर कार्यक्रम आधी महाराष्ट्राची मुलुखमैदानी तोफ संविधान बचाव चळवळीचे प्रणेते,कामगार नेते व ऑल इंडिया संविधान आर्मीची राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे भुसावळ यांनी सावदा बसस्थानक परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर आले.व त्यांनी सर्वप्रथम हाताने नव्या सफेद हातरुमालाने डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुसल्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच सदर ठिकाणी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक विषयाला हात घालताना असे देखील म्हटले की,सावदा नगरीत एस.सी.जातीच्या महिलांसाठी नगराध्यक्ष पद राखीव आहे.परंतू येथील काही नॉन एस.सी.सत्ताधारी यंदाही सत्ता स्वत:च्या घरात ठेवण्यासाठी व सत्तेचा मलीदा लाटण्या करीता त्यांच्या एस.सी.जातीची सुनेला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहे.अशी बातमी मझ्या पर्यंत पोहोचली आहे.तरी त्यांची ही कुटनिती सदर पदासाठी इच्छुक स्थानिक अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना डावलण्याचा डाव आहे.म्हणून ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे सावदा येथे स्थानिक उमेदवार रिंगणात उतरवण्यात येईल.अशी घोषणा सुद्धा यावेळी जगन भाऊ सोनवणे केली आहे.

No comments