रूपाली चाकणकर बुधवारी सांगली दौऱ्यावर, राज्य महिला आयोग आपल्या दारी, उपक्रमांतून जनसुनावणी..!! संभाजी पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रतिनि...
रूपाली चाकणकर बुधवारी सांगली दौऱ्यावर, राज्य महिला आयोग आपल्या दारी, उपक्रमांतून जनसुनावणी..!!
संभाजी पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे महिलांच्या तक्रारी निवारणासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात ( दि. 15 )ऑक्टोंबर जनसुनावणी होणार आहे अशी माहिती रूपाली चाकणकरांनी दिली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर तक्रारीची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता सांगली येथे जनसुनावणी महिलांनी न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे देखील आव्हान आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी केले आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडूंन महिला आयोग आपल्या दारी, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर स्वतः 15 ऑक्टोंबर रोजी सांगली दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्या महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जनसुनावणीनंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन पोलीस परिवहन आरोग्य शिक्षण आदीं विभागांची आढावा बैठक घेणार आहेत. राज्यांच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येवुन आपली तक्रार करणे सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिंकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. याचा लाभ महिलांनी घेण्याचे देखील आव्हान रूपाली चाकणकरांनी केले आहे.
No comments