adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बी. एस.एफ. बहुद्देशीय संस्थेचे आयोजन.. पत्रकार सौ. किरण ताई वाघ यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर..!!

 बी. एस.एफ. बहुद्देशीय संस्थेचे आयोजन.. पत्रकार सौ. किरण ताई वाघ यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर..!!  संभाजी पुरीगोसावी ( सातारा ...

 बी. एस.एफ. बहुद्देशीय संस्थेचे आयोजन..

पत्रकार सौ. किरण ताई वाघ यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर..!! 


संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 बुलढाणा जिल्ह्यातील संपादिका व अभिनेत्री सौ.किरण ताई वाघ मॅडम या नेहमीच पत्रकार क्षेत्रात नेहमीच प्रयत्नशील, असल्याचे दिसून येते.

 दैनिक सत्यजित  सहसंपादक शौर्य स्वाभिमान या वृत्तपत्राच्या मुख्य संपादक. व अभिनेत्री  सौ. किरण ताई वाघ यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेवुन त्यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्या कृती गौरव पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. बी. एस.एफ बहुद्देशीय संस्था, उपेक्षित नायक न्यूज व संकल्प बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कृती गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होणार असून सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता, कृषी, कला अश्या विविध क्षेत्रातील 70 मान्यवरांना कृती गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा नोव्हेंबर महिन्यात होणार असून चित्रपट क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील व पत्रकार क्षेत्रातील दिग्गज लोकांच्या उपस्थिती मध्ये पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक भूषण सरदार असून प्रस्ताव पाठवायचा असल्यास 9420621994 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावा अशी माहिती पुरस्कार सोहळा मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी दिली. आदरणीय संपादिका सौ. किरण ताई वाघ मॅडम यांना गौरव राज्यस्तरीय उत्कृंष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन आणि सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग तसेच पत्रकार बांधवांकडून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा आहेत.

No comments