चोरीचा गुन्हा उघडकीस १३,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!कोतवाली पोलिसांची धडक कारवाई... सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) अ...
चोरीचा गुन्हा उघडकीस १३,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!कोतवाली पोलिसांची धडक कारवाई...
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१४):- शहरातील कोतवाली पोलिसांनी आणखी एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणत १३,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. केवळ काही दिवसांच्या तपासानंतर आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.दि.३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास केडगाव येथील श्री.अंजन नंदकुमार तट यांच्या घरातून अज्ञात व्यक्तीने घरफोडी करून अंदाजे १३,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला नेला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा क्र.९०७/२०२५ दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपासा दरम्यान पोलिसांनी संशयित नंदकुमार दादासाहेब तट यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता,त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख,पोलीस अंमलदार संतोष लगड,विनोद बोरगे,बाळकृष्ण दौंड,विशाल दळवी,प्रतिभा नागरे यांनी केली आहे. अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी कोतवाली पोलिसांचे सततचे प्रयत्न सुरू असून, या यशस्वी कारवाईमुळे पुन्हा एकदा त्यांच्या कार्यतत्परतेची प्रचिती आली आहे. या कारवाईसाठी नागरिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिसांच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
No comments